NCP : शरद पवार गटाच्या युवक आघाडीचा रविवारी शहरात महाराष्ट्राभिमान मेळावा

एमपीसी न्यूज – शरद पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड युवक आघाडीचा (NCP) उद्या रविवारी शहरात महाराष्ट्राभिमान मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शहरात निवडून येणाऱ्या युवकांना संघटनेच्या प्रमुख जबाबदाऱ्या देवून ताकद देणार असल्याची माहिती युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.

सांगवी येथील निळू फुले सभागृहात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत. यावेळी मोटर सायकल यात्रा पण काढण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीतील पक्षफुटीनंतर पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. त्यातच शरद पवार गटातील हालचाली अधिक वेगाने घडत असल्याचं दिसतं आहे. कार्यकारी समितीची निवड, पक्षांतर्गत विविध संघटनांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या, नियोजीत पक्ष कार्यालय, रोहीत पवार, जयंत पाटील, यांचे वाढलेले दौरे, भटक्या विमुक्त समाजाच्या मेळाव्याला शरद पवारांची उपस्थिती, नवीन दमाच्या युवकांचे पक्ष प्रवेश यातून शरद पवार गट शहरात आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

मेळाव्याबाबत माहिती देताना युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी सांगितले की, सकाळी साडेअकरा वाजता मोटर सायकल यात्रा काढून दुपारी साडेबारा ते दोन या वेळेत युवक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या दोन अडीच वर्षापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे काम शहरात जोमाने सुरू आहे.

Wakad : हॉटेलच्या पार्किंगमधील कारची काच फोडून आयफोन व लॅपटॉप चोरीला

काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये शहरातील युवक पदाधिकाऱ्यांनी माझ्यासोबत आदरणीय शरदचंद्रजी (NCP) पवार साहेब यांच्या विचारांवर निष्ठा ठेवत काम करण्याची भूमिका घेतली. याअगोदर शहरात आम्ही संघटनेचे काम करत होतो. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.

त्याचाच एक भाग म्हणून काही मागील आठवड्यात ताकदीच्या युवकांचे प्रवेश घेण्यात आले. उद्याच्या मेळाव्यात जे युवक शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये आपापल्या प्रभागात काम करत आहेत अशा ताकदीच्या युवकांना पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आम्ही मेळाव्याच्या निमित्ताने देणार आहोत. तसेच या युवकांच्या मागे पक्षातील नेत्यांची ताकद उभे करण्यासाठी पक्षाकडे आग्रह धरणार आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.