Wakad :हॉटेलच्या पार्किंगमधील कारची काच फोडून आयफोन व लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – वाकड येथील एका हॉटेलच्या पार्कींगमध्ये (Wakad) पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरांनी कारमधून लॅपटॉप व आयफोन चोरून नेला आहे. हि चोरी गुरुवारी (दि.5) रात्री उशीरा हॉटेल सयाचीच्या पार्कींग परिसरता घडली.

याप्रकरणी राजीवरंजन उमेशकुमार सिन्हा (वय 35 रा. तळेगाव दाभाडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

PCMC : महापालिका रुग्णालयांमधील सेवा-सुविधांचे ‘ऑडिट’ करण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही त्यांची कार हॉटेल (Wakad)पार्कींगमध्ये पार्क करून गेले होते. दरम्यान चोराने गाडीची काच फोडून त्यातील 70 हजार रुपयांचा आयफोन व 25 हजार रुपयांचा आयफोन असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.