Chinchwad : भांडणा दरम्यान रस्त्यावर ढकलून दिल्याने धावत्या गाडीखाली येत तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून भांडण सुरु असताना तरुणाला रस्त्यावर (Chinchwad)  ढकलून दिले. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या कारच्या चाकाखाली पाय आल्याने 26 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.26) सायंकाळी चिंचवड येथील विद्यानगर परिसरात घडला.

याप्रकऱणी प्रशांत अनिल सोनावणे (वय 26 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून सद्दाम शेख (वय 22 रा.चिंचवड) याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chakan : महिलेच्या ट्विटर अकाऊंटवर अश्लील ट्वीट केल्या प्रकरणी एकावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी घरी जात असताना त्यांना रसत्यात त्यांचा मित्र निलेश भेटला. त्यांनी सज्जाद शेख याचा मोबाईल नंबर त्याच्याकडे मागितला. यावेळी आरोपी तेथे आला व त्याने याला नंबर द्यायचा नाही म्हणत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

मारहाण करत त्याने फिर्यादीला रस्त्यावर ढकलून दिले.  रस्त्यावरून जाणाऱ्या कारच्या चाकाखाली फिर्यादी यांचा उजवा पाय आल्याने पोटरी पासून तळव्यापर्यंत दुखापत झाली.

तरीही आरोपी याने फिर्यादीला हाताने मारहाण केली. यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत (Chinchwad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.