Alandi : वारकरी म्हणून निरंतर दर्शनास येतो-दिग्विजय सिंह

एमपीसी न्यूज – आज (दि.28 जून) मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Alandi) दिग्विजय सिंह यांनी आषाढी वारी निमित्ताने माऊली मंदिरास सदिच्छा भेट दिली व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.

यावेळी दिग्विजय सिंह म्हणाले , मी निरंतर वारकरी म्हणून दर्शनास येत आहे.कोव्हिड काळात दोन वर्षे दर्शन घेऊ शकलो नाही.देवाकडे  सर्व आनंदी राहोत, प्रेम,सदभाव,सत्य ,अहिंसा व देश, समाज प्रगती करो,तिरस्कार दूर होवो हे मागितले.

 

त्यांचे हे वारीचे 31 वे वर्ष आहे.तसेच महाराष्ट्राच्या राजकारणा विषयी ते बोलताना म्हणाले महाराष्ट्र सरकार हे बहुमताचे सरकार नाही.चोरी ,दरडेखोरीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस व भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते या सरकारमध्ये मंत्री आहेत.

 

Chinchwad : भांडणा दरम्यान रस्त्यावर ढकलून दिल्याने धावत्या गाडीखाली येत तरुण गंभीर जखमी

 

चंद्रशेखर राव यांच्या बाबत बोलताना ते म्हणाले ,जे सहाशे गाड्या आणतात त्याचा तमाशा तर होणार,तो पाहण्यासाठी जनता तर समोर येणारच

 

यावेळी नंदकुमार वडगांवकर यांनी माहिती देताना सांगितले ,मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आले तर दिग्विजय सिंह पायी वारी करतील.

 

आळंदी शहरातील काँग्रेस पदाधिकारी संदीप नाईकरे यांच्या मातोश्रींचे पालखी प्रस्थान सोहळ्या दिवशी दुःखद निधन झाले होते.याची माहिती कळताच त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले.

 

यावेळी काँग्रेस चे पदाधिकारी अभय छाजेड, नंदकुमार वडगांवकर,मनोज राका,रवींद्र रावडे, पांडुरंग कांबळे,सुभाष नाईकरे व विष्णू तापकीर आदी  उपस्थित (Alandi) होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.