Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरात ख्रिसमस सण आनंदात व उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात आज ख्रिसमस चा सण आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.विद्युत रोषणाईने चमकणारे चर्च, चर्च मधील (Pimpri News) आकर्षक सजावट, मध्यरात्री व सकाळच्या प्रार्थना आणि एकमेकांना ख्रिसमस च्या शुभेच्छा देत ख्रिस्ती बांधवांनी आज ख्रिसमस चा सण आनंदात व उत्साहात साजरा केला.

होली क्रॉस चर्च हे दापोडी मधील जय भीमनगर मध्ये आहे. हे 30 वर्षे जुने चर्च आहे.  दापोडी होली क्रॉस चर्च मधील  पॅरिस काउन्सलचे सभासद दिपक साळवे म्हणाले की, काल रात्री 10.30 वा. पासून ख्रिस्त जन्मोत्सवाच्या निमित्त मिसा (प्रार्थना) करण्यात आली. आज सकाळी फादर अलबर्ट फर्नांडीस यांनी प्रार्थना अर्पण केली.

 

Pimpri News : पिंपरीतील बंद घराला लागली आग

आज विलसन डी पॉल यांनी 80 गरीब कुटूंबांना अन्नधान्य (राशन) वाटप केले. स्वार्था ग्रुपने केक व फराळ वाटप केला. कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी व सांगवी या परिसरातील ख्रिस्ती बंधू व भगिनी या चर्चचे सभासद आहेत.

दापोडी मधील पवार वस्ती येथील नवा करार मंडळी प्रार्थना गृह मध्ये आज सकाळी प्रार्थना करण्यात आली. तसेच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

पिंपरी येथील ‘आवर लेडी कंसोलर ऑफ द ऍफलीक्टेड’ येथे ही ख्रिसमस हा सण हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. काल रात्री 10:00 ते 12 वाजेपर्यंत ख्रिस्ती जन्माच्या (Pimpri News)  निमित्त प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी देखील प्रार्थना करण्यात आली. फादर अमृत फन्सेका यांनी ख्रिस्त जन्माबद्दल प्रवचन दिले. फादर रिचर्ड फादर जेमसनमुनीस, डिकेन सुहास परेरा यांनी सुद्धा प्रार्थनेत सहभाग घेतला.

भू येशू ख्रिस्त यांचा जन्म 2022 वर्षांपूर्वी झाल्यामुळे दापोडी येथे सर्व चर्चमध्ये एकूण 2023 प्लम केकचे वाटप संजय नाना काटे युवा मंच यांच्या माध्यमातून करुन ख्रिसमस साजरा करण्यात आला. तसेच सर्व नागरिकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देवून आनंद साजरा करण्यात आला. दापोडी येथील मुक्ती फौज चर्च मध्ये आज सकाळी प्रार्थना करण्यात आली. केक वाटप करण्यात आले. तसेच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

चिंचवड मधील सेंट झेवियर चर्च, निगडीतील इन्फंट जीजस चर्च आकुर्डीतील ट्रिनिटी चर्च, पिंपरी मधील कामगार नगर मधील दि युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट, काळेवाडीतील केडीसी चर्च व अल्फोंसा चर्च, पिंपरी गावातील हिंदुस्थानी कॉमेंट चर्च येथे ख्रिश्चन बांधवांनी प्रार्थना केली. तसेच मार्थामा चर्च, सेंट फ्रान्सिस चर्च, मुक्ती फौजी चर्च, सेंट मेरी चर्च, सेंट अँड्र्यू चर्च व इतर चर्च मध्ये सुद्धा ख्रिश्चन बांधवांनी प्रार्थना केली.

आज ख्रिसमसच्या निमित्त शहरातील केक्स व गिफ्ट शॉप मध्ये गर्दी दिसत होती. ख्रिसमस साठी खास प्लम केक, फ्रेश केक, मफिन्स यांना जास्त मागणी आहे. काही ठिकाणी ख्रिसमस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.