Kalewadi News : काळेवाडी येथील चायनीज रेस्टॉरंटमध्ये आग, गॅस गळतीमुळे आग

 एमपीसी न्यूज : काळेवाडी येथील किंग चायनीज रेस्टॉरंट ला (Kalewadi News) आज दुपारी आग लागली होती. गॅस गळतीमुळे ही आग लागली असून या आगीत हॅाटेलचे किरकोळ नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती देताना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पिंपरी- काळेवाडी पूलाजवळ व ज्योतिबा मंगल कार्यालयाजवळ असलेल्या हॉटेलला आज दुपारी 3.15 वा च्या सुमारास गॅस गळती मुळे आग लागली होती. पिंपरी मुख्यालयाचा एक अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.

Maval : राष्ट्राच्या प्रगतीमध्ये शिबिरांची भूमिका महत्वाची – चंद्रकांत शेटे

हॉटेल मालक अर्जुन जैस्वाल यांनी अग्निशमन बंब पोहचण्यापूर्वी फायर एक्सटिंगविशरचा वापर करून आग विझवली होती. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी गरम सिलेंडर हॉटेलच्या बाहेर काढला व त्याला पाणी मारून थंड केले. हॉटेल मालक अर्जुन जैस्वाल म्हणाले की, या आगीमुळे किरकोळ नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.