Maval : राष्ट्राच्या प्रगतीमध्ये शिबिरांची भूमिका महत्वाची – चंद्रकांत शेटे

एमपीसी न्यूज – स्वयंशिस्त, बलिदान, मानवता, कष्ट करण्याची तयारी, जिद्द, व्यक्तिमत्व विकास आदी गुणांचा समग्र विकास राष्ट्रीय सेवा योजनांसारख्या शिबिरांमधून होतो. शिबिरांमधून स्वयंसेवक घडतो. परिपक्व झालेला स्वयंसेवक देशाच्या प्रगतीस हातभार लावतो. (Maval) त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये शिबिरांची भूमिका महत्वाची ठरते, असे मत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर मावळ तालुक्यातील कल्हाट येथे पार पडले. शिबिराच्या समारोप प्रसंगी चंद्रकांत शेटे बोलत होते.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा दीप्ती पेठे,प्रा डी पी काकडे, प्रा रोहित नागलगाव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे 100 स्वयंसेवक, गावातील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे पुढे म्हणाले की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक संघाची अनेक शिबिरे मी तुमच्यासारख्या विद्यार्थी दशेत तसेच नंतरच्या काळात सुद्धा शिबिरांमध्ये सहभागी झालो आहे. या शिबिरांमधून मी देखील घडलो आहे. आज विद्यार्थ्यांमध्ये पाहताना मला माझ्या समग्र जीवनाची आठवण होते आहे. विद्यार्थ्यांनी अशा शिबिरांमध्ये सहभागी झाले तर निश्चितपणे त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.

New Rooplaxmi Jewellers : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने खरेदीचा उत्तम पर्याय म्हणजे न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स

स्वयंशिस्त, देशासाठी योगदान, माणुसकीची भावना, कष्ट करण्याची तयारी, जिद्द, व्यक्तिमत्व विकास, या सर्व अंगाने शिबिरांमधून स्वयंसेवक घडत असतो.अशी शिबिरे राष्ट्राच्या विकासासाठी तरुणांचे योगदान नोंदवतात.म्हणूनच ही शिबिरे महत्त्वाची आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की, इंद्रायणी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय सेवा योजनेची मावळ तालुक्यातील जवळपास सगळ्याच गावांमध्ये शिबिरे संपन्न झाली आहेत. आज कल्हाट गावांमधील हे शिबिर 53 वे शिबिर असून या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनेक ग्रामोपयोगी कामे केली आहेत. विशेषत़: ग्रामस्वच्छता, आरोग्य तपासणी, प्रबोधन या सर्व माध्यमातून पूर्वीच्या शिबिरांसारखे योगदान स्वयंसेवकांनी दिले आहे. शिबिरांच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात अनेक माजी विद्यार्थी घडत आहेत ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार प्राचार्यांनी काढले.

याप्रसंगी सात दिवशीय शिबिराचा आढावा कार्यक्रमाधिकारी प्रा. दीप्ती पेठे यांनी घेतला. तसेच शिबिरामध्ये उज्वल कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली.

गावचे सरपंच बिजाताई संतोष जाचक,उपसरपंच कविता पप्पू पवार, जावेद मुलाणी गावातील ग्रामस्थ आदी मान्यवरांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.(Maval) विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वयंसेवक, ग्रामस्थ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी विशेष श्रम करून शिबिर संपन्न केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सर्वांचे अभिनंदन करुन विशेष कौतुक केले. शिबिराच्या समारोप प्रसंगी कार्यक्रमाधिकारी प्रा. डी.पी काकडे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच आभार प्रा. रोहित नागलगाव यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.