Chikhali News : चिखलीच्या जाधववाडीत एक दुचाकी व रिक्षाची जाळपोळ, तर गाड्यांच्या काचांची तोडफोड

एमपीसी न्यूज : चिखलीतील जाधववाडी परिसरात एक दुचाकी व रिक्षा जाळण्यात आल्याची घटना घडली आहे.  तर दोन ते तीन दुचाकी व चार चाकी वाहनांच्या (Chikhali News) काचा फोडण्यात आल्या आहेत. ही घटना काल शनिवार 24 डिसेंबर रोजी घडली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती देताना,  चिखली पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गुमाणे म्हणाले की, अनिल रत्ने, रा. जाधववाडी, चिखली यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व इतरांनी त्यांच्या घराजवळ रात्री वाहने पार्क केली होती. आज मध्यरात्री 12.30 वा च्या सुमारास वाहनांना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या दुचाकीला व एका रिक्षेला आग लागली होती. तसेच 2 ते 3 दुचाकी व चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.

Kalewadi News : काळेवाडी येथील चायनीज रेस्टॉरंटमध्ये आग, गॅस गळतीमुळे आग

फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार काल रात्री 10.30 ते आज मध्यरात्री 12.30 वा दरम्यान अज्ञात आरोपींनी वाहनांना आग लावली होती. चिखली पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गुमाणे या प्रकरणी  पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.