Pune : मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घरात घुसून महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि धमकावल्याप्रकरणी माजी नगरसेविका आणि मनसेच्या महिला शहराध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्यासह पाच जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी दीपा करमरकर (वय-35, रा.पानमळा, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. रुपाली ठोंबरे यांच्यासह सोनाली भारद्वाज, आशा पाटील, मोनिका कुटे, स्नेहल निकम आणि रुपेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानमळा परिसरातील एका इमारतीत फिर्यादी दीपा करमरकर वास्तव्यास आहेत.गुरुवारी (21 जून) रुपाली पाटील यांनी दीपा करमरकर यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांना शिवीगाळ करून आणि धमकी दिली. फोन करून इतरांना बोलावून घेतले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.