Congress News : भाजपने राम मंदीरासाठी भीक मागितली, असे म्हणावे काय? – गोपाळ तिवारी

एमपीसी न्यूज – सामाजिक क्रांतीचे प्रणेते, महापुरूष डॅा आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील (Congress News) आदींनी शाळा – शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितल्याचे विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले. त्यावर राज्य काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजप’ने देखील राम मंदीरासाठी वर्गणी नव्हे तर भीक वा खंडणी मागितली काय? असा तिखट सवाल केला आहे.

या विषयी प्रदेश काँग्रेसने दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाजपची नियत, निती व संस्कारांविषयी टिका करतांना सांगितले की, येन-केन प्रकारे महाराष्ट्राच्या अस्मिता व मानांकनांविषयी अवहेलना करण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसुन येत आहे. एकीकडे ‘स्वातंत्र्योत्तर लोकशाही रूपी भारतास’ 21 व्या शतकाची दृष्टी देत सक्षम, शिक्षीत, स्वयंपुर्ण व प्रगतीशील बनवण्याकरीता पुर्वीच्या काँग्रेस सरकारांनी शिक्षणाचा व साक्षरतेचा प्रचार व प्रसार करीत शिक्षणाची कवाडे युवापिढीसाठी खुली केली!

मुलींना मोफत शिक्षण, गरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (Congress News) फी माफीसाठी नादारी दिली. पुढे जाऊन तत्कालीन युपीए अध्यक्षा सोनिया व काँग्रेसच्या पुढाकाराने ‘शिक्षण हक्क’ कायदा केला. पुरोगामी महाराष्ट्राचे नेते स्व वसंतदादा, विलासराव देशमुख, रामकृष्ण मोरे यांनी राज्यात शिक्षण प्रचार प्रसाराचा कृतीशील कार्यक्रम राबवला. स्वातंत्र्य प्राप्त होते वेळी साक्षरता-प्रमाण 14% असणाऱ्या देशात 2014 अखेर 78% पर्यंत नेले..!

PCMC: हिवाळी अधिवेशनासाठी पालिकेतील समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

मात्र, याच्या नेमके विरोधी पाऊल देशातील सत्ताधारी भाजप व राज्यातील न्याय प्रविष्ट ईडी सरकार उचलत असल्याचे स्पष्ट होते आहे. राज्यात ‘पट-संख्येच्या’ कारणावर ग्रामीण भागातील शेकडो शाळा बंद करणे, गरीब व मागास वर्गीय विद्यार्थ्यांना फी माफी सवलत रद्द करणे व शाळा-महाविद्यालये यांना सरकारी अनुदान देण्यास टाळाटाळ करणे, शिक्षणाबाबत सरकारी कर्तव्ये निभावण्याविषयी अनिच्छा, अनास्था वा तिरस्कार व्यक्त करणे व देशाचे बोध वाक्यात ‘सत्यमेव जयते’ ऐवजी ‘श्रममेव जयते’ (श्रमास प्रतिष्ठा) करण्याचा घाट घालत, देशास संविधान कर्तव्यांपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न करीत देशास १६ व्या शतकात / मनुवादी संस्कृती वा गुलामशाहीत ढकलण्याचे मनसुबे स्पष्ट होत आहेत..! अशी प्रतिक्रिया राज्य काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.