Railway Police: रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत पोलीस कोठडीत असलेल्या तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

एमपीसी न्यूज: रेल्वे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या एका 32 वर्षे तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.(Railway Police) तर दुसरीकडे त्याच्या नातेवाईकांनी मात्र पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. तसेच याला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. नागेश रामदास पवार (वय 32) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश पवार हा चोरीच्या गुन्ह्याखाली वांटेड आरोपी होता. त्याच्यावर चोरीचे सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली होती. पोलीस कोठडीत असतानाच तो आजारी पडला. त्यानंतर उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

Alandi News: आळंदी मध्ये हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन

तर दुसरीकडे मयत नागेशची पत्नी आणि बहिणीने रेल्वे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तो आजारी होता तर आम्हाला का सांगितले नाही.(Railway Police) पोलिसांनी केलेल्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि दोषी असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली.

तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी देखील या प्रकरणात दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. गिरीश प्रभुणे म्हणाले नागेश हा चांगला आणि होतकरू मुलगा होता. छोटी मोठी कामे करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पोलीस त्याला घेऊन गेले तेव्हा तो चांगला धडधाकट होता.(Railway Police) मात्र अचानक आजारी कसा पडला. त्याचा मृत्यू कसा झाला याची चौकशी व्हावी आणि याप्रकरणी दोषी असणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.