Alandi News: आळंदी मध्ये हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन

एमपीसी न्यूज: हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या 114 व्या जयंती निमित्त आळंदी येथे इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने व श्रीमती लक्ष्मीबाई दुराफे विद्यालयात शालेय मुले,शिक्षक,शिक्षेतर कर्मचारी ,स्थानिक नागरिक यांच्या वतीने हुतात्मा राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले.(Alandi News) देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू  हे फासावर गेले. देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे शौर्य हे आज ही युवकांना प्रेरणा देते. त्यातीलच एक म्हणजे शहीद राजगुरू.

 

राजगुरू यांनी भगतसिंग आणि सुखदेवसह फासावर जाऊन देशाच्या स्वातंत्र्याबाबतची त्यांची निष्ठा प्रखरतेने दाखवून दिली होती असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या नेत्या कोमल काळभोर यांनी आळंदी येथे व्यक्त केले. महीला किर्तनकार हभप स्वप्नाली आबटकर म्हणाल्या की, प्रखर देशभक्तीचे धगधगते निखारे क्रांतिकारक भगतसिंग,सुखदेव,राजगुरु हे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्वालेतील तीन धगधगते निखारे होते.(Alandi News) इतिहासात त्यांच्या प्रखर देशभक्तीच्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरात लिहिल्या जात असताना या तीन रत्नांतील एक तेजस्वी रत्न म्हणजे मराठी मातीतील शिवराम हरी राजगुरु आहेत.

Today’s Horoscope 25 August 2022-जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यावेळी येथे विठ्ठल शिंदे,शिरिष कारेकर,दिनेश कुऱ्हाडे इ. इंद्रायणी फौउंडेशन सदस्य उपस्थित होते. तर श्रीमती लक्ष्मीबाई दुराफे विद्यालयात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू,भगतसिंग, सुखदेव यांच्या कार्याची माहिती शालेय मुलांना देण्यात आली.क्रांतिकारकांच्या जयघोषाच्या घोषणा देत मुलां मध्ये देशाभिमान जागृत करण्यात आला.(Alandi News) यावेळी उपमुख्याध्यापक तात्यासाहेब गावडे,ज्येष्ठ शिक्षिका जे.एस. वाघमारे इ.शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.