Dehugaon : गायरान वाचविण्यासाठीच्या देहू ग्रामस्थांच्या उपोषणाला संदीप वाघेरे यांचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – तीर्थक्षेत्र देहू येथील गायरान पोलीस आयुक्तांना देण्यास विरोध ( Dehugaon) करत उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांच्या उपोषणाला भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी जाहीर पाठिंबा दिला.

तीर्थक्षेत्र देहू हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जन्म व कर्मभूमी आहे. तुकाराम बीज सोहळा व आषाढी पायी वारी पालखी सोहळा तसेच वसंत पंचमी हा संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस तसेच कार्तिकी वारीस जगभरातून लाखो वारकरी व भाविक भक्त श्री क्षेत्र देहूमध्ये येतात. देहूच्या दीडशे एकर गायरानापैकी पन्नास  एकर गायरान हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाला देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू आहेत.

Pimpri : सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडण्या अगोदर बांधकाम व्यवसायिकांवर कारवाई करा – संजीवन सांगळे

संत तुकाराम महाराज संस्थान व देहू ग्रामस्थांच्या वतीने या प्रस्तावाला विरोध करण्यात आला आहे. गायरान वाचवण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे.या उपोषणास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे  यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. गायरान देहूमध्ये होणाऱ्या विविध धार्मिक तसेच  सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्यात यावे.जागेमध्ये विविध प्रकल्प उभारण्यात यावे यासाठी आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत असे वाघेरे यांनी सांगितले.

यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजाताई दिवटे, ह.भ. प. संजय महाराज मोरे नगरसेवक योगेश परंडवाल, माजी नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, नगरसेवक प्रवीण काळोखे, जनजागृती मंचचे अध्यक्ष प्रकाश काळोखे, युवा नेते प्रशांत काळोखे, माजी उपसरपंच स्वप्निल काळोखे, माजी उपसरपंच प्रकाश हगवणे आदी ( Dehugaon)  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.