Pimpri : सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडण्या अगोदर बांधकाम व्यवसायिकांवर कारवाई करा – संजीवन सांगळे

एमपीसी न्यूज – एसटीपी प्रकल्प बंद असलेल्या  41 गृहप्रकल्पाच्या बांधकाम व्यवसायिकांवर ( Pimpri) अगोदर कारवाई करावी. त्याचप्रमाणे चुकीची व कुचकामी निकृष्ट एसटीपी यंत्रणा असताना देखील तपासणी न करता गृहकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी, अशी मागणी  चिखली-मोशी -पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रशानचा हा निर्णय एकतर्फी आहे. बांधकाम व्यवसायिकांनी गृहप्रकल्पामध्ये बसवलेले एसटीपी अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच विकसकाकडून सोसायटी हस्तांतरण करत असताना एसटीपी या चालू अवस्थेत नव्हत्या. फक्त याच 41 सोसायट्यांच्या नव्हे तर शहरातील बऱ्याच सोसायट्यांमधील एसटीपी विकसकाकडून सोसायटी हस्तांतरण करत असताना बंद असतात.

Maval : पवना धरणाकाठच्या 40 अनधिकृत व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीसा

त्या चालू अवस्थेत नसतात ,तरी त्या आमच्या सोसायटीधारकांच्या माथी मारल्या जातात.शहरातील 90 टक्के गृहप्रकल्पामध्ये एसटीपी प्रकल्प कार्यान्वित नसताना देखील आपल्या बांधकाम विभागाकडून पार्ट कंम्प्लिशन , (भाग पूर्णत्वाचा दाखला) दिला जातो. याबाबत फेडरेशन मार्फत आपणाला वेळोवेळी लिखित तक्रारी देखील केलेल्या आहेत. या सर्व गोष्टी आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. तरी पण आपण शहरातील बांधकाम व्यवसायिकांना पाठीशी घालत यावर कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही.

महानगरपालिकेला बांधकाम व्यवसायिकांनी जोपर्यंत भामा आसखेडचा टप्पा क्रमांक पाच आणि सहा पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे बांधकाम व्यवसायिक स्वखर्चाने पाणी पुरवतील अशा लिहून दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 200 प्रमाणे यांच्यावर देखील कारवाई करण्याची तक्रार आम्ही केली होती. परंतु यावर देखील आपल्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही..परंतु प्रमाणिकपणे मालमत्ता कर भरणाऱ्या आमच्या 41 गृहरचना संस्थेतील सोसायटीधारकांची काही चूक नसताना त्यांचे पाण्याची नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई मात्र आपण अतिशय तत्परतेने करत ( Pimpri) आहात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.