Maval : पवना धरणाकाठच्या 40 अनधिकृत व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीसा

एमपीसी न्यूज – पवना धरणाच्या काठावर टेंट व्यवसाय जोर धरत ( Maval )आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी अनधिकृतपणे टेंट व्यवसाय थाटले आहेत. अशा 40 व्यावसायिकांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत जलसंपदा विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

मावळ तालुक्यातील धरणांपैकी महत्वाचे असलेले पवना धरण आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. खंडाळा, लोणावळा नंतर आता पर्यटकांचे लक्ष पवना धरणाकडे जात आहे. धरणालगत असलेली नैसर्गिक संपदा आणि धरणाचे अथांग पाणी पर्यटकांना मोहित करते. हाच धागा ओळखून अनेकांनी जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जागेवर अतिक्रमण करून टेंट व्यवसाय, हॉटेल सुरु केले आहेत.

जलसंपदा विभागाने धरण बांधतानाच धरणालगतची जमीन संपादित केली आहे. असे असताना त्या जमिनीवर अलीकडच्या काळात अतिक्रमण होत आहे. जमीन सपाट करून धरणात भिंती बांधून तिथे अनधिकृतपणे व्यवसाय थाटले जात आहेत. त्यातच थर्माकोल, प्लास्टिक, काचा या धरणात फेकल्या जातात. यामुळे जल प्रदूषण वाढत आहे.

Pune : खळखट्याक आंदोलन प्रकरणी मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह सात ते आठ जण पोलिसांच्या ताब्यात

कॅम्पिंगच्या परिसरात रात्रभर डीजेचा दणदणाट असतो. मद्यविक्री देखील इथे जोरात सुरु असते. त्यामुळे अनेक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होते. शिवाय रात्रभर वाजणाऱ्या डीजेमुळे परिसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत.

त्यामुळे इथल्या मद्य पार्ट्या, कॅम्प फायर, बार्बेक्यू आणि डीजे सुरु असेल तर अशांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच अनधिकृत टेंट धारकांना त्यांनी केलेले अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीसा देखील बजावण्यात आल्या आहेत. ही अतिक्रमणे काढून न घेतल्यास संबंधितांवर फौजदारी खटले दाखल करण्याची तयारी जलसंपदा विभागाने दर्शवली आहे.

पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया म्हणाले, “पवना धरणाच्या आजूबाजूला असलेल्या अनधिकृत कॅम्पना नोटीसा दिल्या आहेत. ही अतिक्रमणे काढून न घेतल्यास ती जमीनदोस्त केली जातील. कारवाईला विरोध केल्यास गुन्हे दाखल केले ( Maval ) जातील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.