Dehuroad : एकमेकांकडे पाहिल्याच्या रागातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज – एकमेकांकडे पाहिल्याच्या रागातून चौघांनी (Dehuroad) मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 13) रात्री दहा वाजता देहूरोड येथे घडली.

छोटू लक्ष्मण जतने, सुरज लक्ष्मण जतने, साहिल लक्ष्मण जतने, लक्ष्मण जतने (सर्व रा. शिवाजी नगर,देहूरोड) अशी  आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उमर कासीम शेख (वय 22, रा. आंबेडकर रोड, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : महापालिकेच्या मीम स्पर्धेतून ‘मीम्स’चा पाऊस; राज्यभरातून प्रतिसाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे देहूरोड येथील एका मेडिकल दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी आरोपी छोटू आणि फिर्यादी यांच्यात एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून (Dehuroad) छोटू याने त्याच्या भाऊ आणि वडिलांना बोलावून फिर्यादीस बेदम मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.