Extortion Case : व्हॉटसअप मॅसेजवरून धमकी देत 10 लाखांच्या खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज-व्हॉटसअप वर मेसेजकरून जीवे मारण्याची धमकी देत 1 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्यावर (Extortion Case) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील रविवार म्हणजे 13 नोव्हेंबर पासून सुरु आहे.

पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; सराईत गुन्हेगाराकडून पोलीस कर्मचाऱ्यावर प्राण घातक हल्ला

याप्रकरणी कालिदास बबन शिंदे (वय 36 रा. खालुंब्रे, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्हॉटसअप क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीची सर्व माहिती काढली व नंतर त्याने फिर्यादी यांच्या व्हॉसअप क्रमांकावर धमकीचे मॅसेज पाठविण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने मॅसेजमध्ये म्हटले की, तुला व तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन, पोकसेनचे मशीन जाळून टाकीन,हे न को असेल तर 1 लाख रुपये दे अशी खंडणी मागितली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.