Crime News : केस मागे घेण्यासाठी खंडणी मागणारा अटकेत

एमपीसी न्यूज – मुलावर दाखल केलेली कोर्ट केस मागे घेण्यासाठी 40 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या इराणी इसमाला पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा दोन यांनी केली आहे. फर्जाद मोहम्मद रिझा फख्रबादी (वय 31 रा.कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्यामुलावर 2018 साली एका मुलीने गुन्हा दाखल केला होता. आरोपीने तो अंजुमन इराणी ग्रुपचा सदस्य असून संबंधीत गुन्ह्यातील फिर्यादी मुलगी ही माझी मैत्रीण असल्याचे त्याने फिर्यादी महिलेला सांगितले. मी तीला केस मागे घ्यायला लावतो सांगत त्यासाठी आरोपीने 40 लाख रुपयांची मागणी केली. 6 ऑक्टोबर रोजीही आरोपी व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येवून फिर्यादी व त्यांच्या मुलाला 40 लाख रुपयांची मागणी करत बघुन घेण्याची धमकी दिली. यावरून कोरेगाव पार्क येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास करत असताना पेलिसांनी फर्जाद याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खंडणी मागितल्याचे मान्य केले. यावरून कोरेगाव पार्क येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढिल तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते करत आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस अमंलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, मोहसीन शेख, गजानन सोनुने, साधना ताम्हाणे, समिर पटेल, निखील जाधव, कादीर शेख यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.