Alandi : माउली माउलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला असून विठूमाउलींची आस लागलेले लाखो वैष्णव उद्यापासून (दि.7 जुलै) माउलींच्या पालखीसह पंढरीच्या दिशेने प्रवास करणार आहेत. या आनंददायी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल झाले आहेत.

माउलींच्या चरणी पावसाचीही हजेरी 

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आळंदीनगरीत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वारीसाठी अलंकापुरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांची काही काळासाठी धांदल उडाली. तरीही पावसाची तमा न बाळगता पावसाच्या सरी अंगावर झेलत वारकऱ्यांनी दर्शनरांगेतून मंदिरात जात माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतलेच.

"mauli

"dnyaneshwar"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.