Pimpri : आंतरशालेय स्पर्धेत मिलेनीयम, एसएनबीपी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्यपद स्पर्धा 
बीईजी, क्रिडा प्रबोधिनी संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश 
 
एमपीसी न्यूज –  कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशन तर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप आणि क्रिडा प्रबोधिनी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. आंतरशालेय स्पर्धेत मुलींच्या 14 वर्षाखालील गटात एसएनबीपी व मिलेनीयम स्कूल या संघांनी अंतिम फेरी गाठली.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ज गटात बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप संघाने रेल्वे पोलिस संघाचा 2-0 असा सहज पराभव केला. बीईजीकडून अबंग सिंग व लक्ष्मण कैरे यांनी गोल केले.

 
इ गटाच्या सामन्यात क्रिडा प्रबोधिनी संघाने ग्रीन मेडोज् संघाचा  9-0 असा धुव्वा उडवून आगेकूच केली. यामध्ये तालिब शहा याने दोन, अनिकेत गौरव याने 3, प्रणव जाधव याने 1, प्रज्वल मोहेनकर याने दोन आणि हरीश शिंदे याने एक गोल केला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकालः
1) गट जः बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपः 2 (अबंग सिंग 10 मि., लक्ष्मण कैरे 14 मि.) वि.वि. रेल्वे पोलिसः 0; हाफ टाईमः 2-0;
2) गट फः पुणे शहर पोलिसः 4 (विनोद बारामतीकर 9 मि., गौरव कांबळे 12 मिण, कुणाल जगदाळे 21 मि., गणेश गिरी 34 मि.)वि.वि. रक्षक एससीः 0;
3) गट इः क्रिडा प्रबोधिनीः 9 (तालिब शहा 9, 13 मि.,अनिकेत गौरव 12, 32, 35 मि., प्रणव जाधव 14 मि., प्रज्वल मोहेनकर 37, 45 मि., हरीश शिंदे 47 मि.) वि.वि. ग्रीन मेडोज्ः 0;
4) गट कः अस्पत अ‍ॅकॅडमीः 7 (शक्ती ठाकूर 11, 29, 48 मि., संजा एम. 20, 39, 49 मि., आकाश राजपुत 41 मि.) वि.वि. सुपर इलेव्हनः 2 (आकश सपकाळ 8, मनीष चव्हाण 44 मि.); हाफ टाईम 2-1;
5) गट जः गट जः बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप ः 3 (अलिम शेख 16 मि., राहूल तिर्के 31 मि., कांचन राजभोर 42 मि.) वि.वि. मुंबई कस्टमः 1 (जयेश जाधव 41 मि.); हाफ टाईमः 1-0;
आंतरशालेयः मुलीः 14 वर्षाखालीलः उपांत्य 1ः मिलेनियम हायस्कूलः 1 (श्रृती थोरात 4 मि.) वि.वि. सेंट जोसेफ हायस्कूल पाषाणः 0;
उपांत्य 2ः एसएनबीपी स्कूलः 1 (मानसी खरे14 मि.) वि.वि. अँग्लोउर्दु स्कूल, पाषाणः 0;
17 वर्षाखालील मुलीः आलेगांवकर हायस्कूल, खडकीः 3 (प्रियंका वाघमोरे 20, 24 मि., प्राजक्ता माने 23 मि.) वि.वि. सेंट उर्सुला हायस्कूल निगडीः 0;
2) सेंट पॅट्रीकः 2 (गौरी भुजबळ 1 मि., इशा चौधरी 2 मि.) वि.वि. ज्योती इंग्लिश स्कूल, नेहरूनगरः 0;
3) आलेगांवकर हायस्कूल, खडकीः 1 (निकीता लांडगे 11 मि.) वि.वि. सेंट जोसेफ हायस्कूल, पाषाणः 0;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.