Pune : एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी, बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप यांच्यात विजेतेपदासाठी लढत !

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्यपद स्पर्धा

एमपीसी न्यूज- कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशनतर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी आणि बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. 14 वर्षाखालील गटामध्ये मिलेनियम स्कूलने मुलींच्या गटाचे तर, एसएनबीपी स्कूलने मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळवले.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी संघाने सडन डेथमध्ये क्रिडा प्रबोधिनीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अतिशय अतितटीच्या झालेल्या सामन्यात पूर्ण वेळामध्ये 3-3 अशी तर, पेनल्टी शूटआऊट मध्ये 2-2 अशी बरोबरी झाली. निर्णायक सडन डेथमध्ये एक्सलन्सी संघाने बाजी मारली. युवराज वाल्मिकी याने सामन्यात तीन गोल केले. तर, विनीत शेट्टी व विनीत कांबळे यांनी गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसर्‍या सामन्यात खडकीच्या बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप संघाने हॉकी युनायटेड संघाचा 5-2 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. यामध्ये बीईजीकडून राहूल तिर्के याने 3 गोल तर, जवालम कुजर व कांचन राजभेर यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.

14 वर्षाखालील गटामध्ये मुलींच्या अंतिम फेरीत न्यु मिलेनियम स्कूलने एसएनबीपी स्कूलचा 2-0 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळवले. गौरी धावरे व सांची कुटे यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फैजल शेख याने केलेल्या कामगिरीमुळे एसएनबीपी स्कूलने पीसीएमसी संघाचा पराभव करून मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्य फेरीः 1) एक्सलन्सी अ‍ॅकॅडमी 3 (2, 1) (युवराज वाल्मिकी 25, 31, 38 मि., विनीत शेट्टी, विनीत कांबळे, विनीत कांबळे) वि.वि. क्रिडा प्रबोधिनीः 3 (2, 0) (तालिब शेख 15, 19 मि., अंकित गौरव 32 मि., अंकित गौरव, तालिब शेख); हाफ टाईमः 1-2;
2) बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप, खडकीः 5 (जवालम कुजर 5 मि., राहूल तिर्के 15, 39, 45 मि., कांचन राजभेर 25 मि.) वि.वि. हॉकी युनायटेडः 2 (वाजिद शेख 7 मि., अरविंद यादव 21 मि.); हाफ टाईम 3-2;
14 वर्षाखालील मुलीः अंतिमः न्यु मिलेनियम स्कूलः 2 (गौरी धावरे 6 मि., सांची कुटे 15 मि.) वि.वि. एसएनबीपी स्कूलः 0; हाफ टाईमः 1-0;
मुलेः अंतिमः एसएनबीपी स्कूलः 1 (फैजल शेख 15 मि.) वि.वि. पीसीएमसीः 0; हाफ टाईम 0ः0;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.