Pimpri : बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप, हॉकी युनायटेड संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश !

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्यपद स्पर्धा 
 
मपीसी न्यूज – कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशन तर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत खडकीच्या बाम्बे इंजिनिअरींग ग्रुप आणि हॉकी युनायटेड या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 
 
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपुर्व फेरीत हॉकी युनायटेड संघाने पीसीएमसी इलेव्हन संघाचा 7-2 असा सहज पराभव केलाण हॉकी युनायटेड संघाकडून अमित राजपूत, सुनिल के. आणि अंकित गौड यांनी प्रत्येकी दोन गोल केले. वाजिद शेख याने संघाकडून एक गोल केला. पीसीएमसी इलेव्हन संघाकडून अभिषेक माने व अजय गोडे यांनी गोल केले. 

 
दुसर्‍या सामन्यात बॉम्बे इंजिनिअरींग गु्रप, खडकी संघानेआयकर विभाग, पुणे संघाचा 3-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कांचन राजभेर, राहूल तिर्के व जवालाम कुजर यांच्या गोलांच्या जोरावर संघाने विजय साध्य केला. आयकर विभाग संघाकडून सुरज शाही याने एक गोल करून गोलांची आघाडी कमी केली.  
 
स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्यपूर्व फेरीः हॉकी युनायटेडः 7 (वाजिद शेख 7 मि., अमित राजपूत 10, 13 मि., सुनिल के. 28, 44 मि., अंकित गौड 30, 42 मि.) वि.वि. पीसीएमसी इलेव्हनः 2 (अभिषेक माने 19 मि., अजय गोडे 35 मि.); हाफ टाईम 3-1;  
 
2) बॉम्बे इंजीनिअरींग गु्रप, खडकीः 3 (कांचन राजभेर 26 मिं, राहूल तिर्के 27 मि., जवालाम कुजर 42 मि.) वि.वि. आयकर विभाग, पुणेः 1 (सुरज शाही 48 मि.); हाफ टाईमः 1-0;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.