Pimpri : विविध संस्था व संघटनांनी केली वारक-यांची सेवा

एमपीसी  न्यूज –  विविध सामाजिक संस्था व संघटनाच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज पालखीतील वारक-यांची सेवा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्या वतीने  श्री संत तुकाराम मराहाज पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी असोसिएशनच्या वतीने अन्नदान करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, उपाध्यक्ष अॅड. कालिदास इंगळे. अॅड. प्रसन्ना लोखंडे, अॅड. राजेंद्र काळभोर, अॅड. सुनील कड, अॅड. अतुल अडसरे, अॅड. योगेश थंबा, अॅड. सुनील कडुसकर, अॅड. प्रतिक जगताप, अॅड. तुकाराम पडवळे यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले.  
 
अॅड. राजेश पुणेकर म्हणाले की, पालखी सोहळयामुळे आजच्या आधुनिक युगामध्ये महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा यांची जपणूक होते. तसेच नव्या पिढीला देखील आपल्या संस्कृती व परंपरा याची जपणूक होते. 
 
जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आई बाबा प्रतिष्ठान व सिद्धार्थ नवरात्र मित्र महोत्सव संस्थापक व स्विकृत सदस्य सुनील कदम यांच्या वतीने बोरमलबाथ महाराज प्रासादिक दिंडी मुळशीकर सर्व वारकरी संप्रदायांना अन्नदान करण्यात आले. यासाठी सहकार्य भागवताचार्य अंजली सचिन गुरव, हभप सचिन महाराज गुरव यांचे लाभले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, आई बाबा प्रतिष्ठान व सिद्धार्थ नवरात्र मित्र महोत्सवाचे अध्यक्ष सुनील कदम, स्विकृत सदस्य दिनेश यादव आदी उपस्थित होते. अजित शेट्टी, रईज शेख, योगेश पटांगळे, स्वप्नील मवाळ, ममनून शेख, राम सूर्यवंशी, मोहन धुमाळ, अनिकेत आसवले, मेघराज कलबेकर, रोहित सूर्यवंशी, अमित ठाकुर, नरेंद्र राजपूत आदींनी संयोजन केले. 
 
चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या वतीने जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आकुर्डी, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन येथे आगमन होत असताना चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील 980 विद्यार्थ्यांने स्वागत करुन भक्ती भावनेने दर्शन घेऊन, प्लास्टीकचे निर्मूलन, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड करा. आदीचे हातात फलक घेऊन प्रबोधन करुन जन जागृती केली. या उपक्रमाचे उत्सफूर्त स्वागत वारकरी व नागरिकांच्या वतीने करण्यात आले. सदर उपक्रम संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वनिता कुर्‍हाडे, प्रा. संध्या गोरे, प्रा.सुनिता गायकवाड, प्रा.सुरेखा कुंभार, प्रा. स्नेहल भाटीया, प्रा.सुकन्या बॅनर्जी, चैताली चॅटर्जी, प्रा. कन्हैय्या पाटील, प्रा.मच्छिंद्र सोनवणे, प्रा.रविंद्र निरगुडे, प्रा.अमोल कोठावदे, प्रा.दर्शन गंधे, प्रा.राकेश कुंभार, आदींचा समावेश होता. प्रबोधन करुन सर्वजन दिंडीत सहभागी झाले. 
 

श्री संत तुकाराम महाराज पालखीतील वारक-यांसाठी भक्ती शक्ती निगडी येथे संस्कार प्रतिष्ठान आणि टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन टाटा मोटर्सचे समाज विकास प्रमुख श्रीयुत अचिंत्य सिंग व श्रीयुत मयुरेश कुलकर्णी यांनी केले. यामध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, पायदुखी, मानदुखी, डोळे, कान, नाक, घसा दातांची व पोटाचे विकार यांची तपासणी करुन औषधे दिली. सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत शिबिर घेण्यात आले. एकूण 2245 वारक-यांची तपासणी करुन औषधांचे वाटप केले तपासणीसाठी टाटा मोटर्सचे डॉ. शरद जगमवार डॉ. अरविंद वाघचौरे डॉ मृणाल फोंडेकर डॉ. निखील राक्षे, डॉ. निरज पाटील, डॉ कोमल कदम, डॉ प्रिया नायर, डॉ. माने यांनी केली. औषधांसाठी लक्ष्मी मेडिकल चिंचवड सप्तश्रुंगी मेडिकल काळेवाडी पाटील मेडिकल बिजलीनगर शिवम मेडिकल वाल्हेकरवाडी शुश्रुत आयुर्वेद चिंचवड स्टेशन यांनी मदत केली. ७०० वारक-यांच्या हातापायांची मसाज करण्यात आली. 130  स्वयंसेवक विशेष पोलीस अधिकारी म्हणून देहू ते पिंपरी असे दोन दिवस भर पावसात निगडी, पिंपरी आणि चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंदोबस्ताला व वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करीत होते. 
 
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या संत जिजाबाई महिला दिंडीत सहभागी वारकऱ्यांना दळवीनगर येथील श्री.पंढरीनाथ विनायक दळवी यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले.या वेळी देहू देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प जालिंदर काळोखे महाराज,ब प्रभाग अध्यक्षा सौ.करूणाताई चिंचवडे,चिंचवड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.प्रभाकर शिंदे साहेब, प्रवचनकार सौ.सुप्रियाताई साठे-ठाकुर,दिंडीमालक सौ.विजया साठे आदी उपस्थित होते.  
 
विश्वहिंदू परिषदेतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज आषाढी वारीमध्ये गेली 29 वर्ष पुणे ते पंढरपूर वारकऱ्यांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका असतात. यावर्षी पासून संत तुकाराम महाराजांच्या दिंडी सोबत निगडीपासून रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. सदर रूग्णवाहिकेचे उद्घाटन कल्याण सहकारी बँक चिंचवडचे मॅनेजर पाटील , विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष शरद इनामदार , डॉ. बी.के. झा , जयंत कड ,याती केळे , डॉ. पोतनीस , डॉ. लबडे डॉ. प्रतिभा लबडे , विजया रोडे यांनी वारकरी रुग्णांना सेवा दिली.  
 
रुग्णवाहिनी प्रमुख यशवंत देशपांडे, विठ्ठल जाधव शेखर राऊत पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन वि. हिं. परिषद जिल्हा सहमंत्री आप्पा कुलकर्णी यांनी केले. खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, सुलभा उबाळे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. वैष्णवांचा मेळा असलेल्या पालखी सोहळ्यात फिनोलेक्स पाईप्स दरवर्षीच महत्त्वाचा वाटा उचलते. वारीमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातून वारकरी सहभागी होतात. त्यांना उपयुक्त ठरतील, अशा गोष्टी फिनोलेक्सतर्फे दिल्या जातात. यंदाही फिनोलेक्स पाईप्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने निगडी व दिघी येथे वारकऱ्यांसाठी सेवा देण्यात आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिघी येथे फिनोलेक्स पाईप्सच्या वतीने १५ हजार हरिपाठ, २२ हजार पिशव्या व सहा हजार टोप्यांचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सहकार्याने दिघीतील मुख्य चौकात आरोग्य तपासणी शिबिर आयोजिले होते. त्यामध्ये प्राथमिक उपचारांबरोबरच किरकोळ स्वरूपाचे आजार, अंगदुखी, पोटदुखी, ताप, डोकेदुखी, जखमांवरची मलमपट्टी, खोकला, अपचन, अशक्तपणा, अ‍ॅलर्जी, उष्माविकार, डीहायड्रेशन, डोळ्यांचे आणि कानांचे विकार आदींवर औषधोपचार करण्यात आले. ससून रुग्णालयातील चार डॉक्टरांच्या टीमने वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. 
 
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर निगडी येथे फिनोलेक्स पाईप्सच्या वतीने १५ हजार हरिपाठ, १८ हजार पिशव्या व सहा हजार टोप्यांचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. फिनोलेक्सच्या विपणन विभागाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी व विश्वजित हरुगडे यांच्या नेतृत्वाखाली १५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी या वस्तू वाटप व आरोग्य शिबिराचे यशस्वी नियोजन केले. उपक्रमाविषयी माहिती देताना नितीन कुलकर्णी म्हणाले, "फिनोलेक्सचे शेतकऱ्यांशी वर्षांनुवर्षांचे नाते आहे. वारीमध्ये शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी होतात. त्यांच्याशी असलेल्या बांधिलकीच्या भावनेतून दरवर्षी वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम करतो. त्यात प्रामुख्याने बॅगा, टोप्या वाटप, तसेच मुकुल माधव फाउंडेशनकडून आरोग्य शिबिर आदींचा समावेश असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.