Pimpri : क्रिडा प्रबोधिनी, एक्सलन्स् अ‍ॅकॅडमी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश.

सातवी कै. हुसेन हॉकी अजिंक्यपद स्पर्धा 

एमपीसी न्यूज –  कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशन तर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेत क्रिडा प्रबोधिनी आणि एक्सलन्स् अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. 

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपुर्व फेरीत क्रिडा प्रबोधिनी संघाने एसआरपीएफ संघाचा 9-1 असा सहज धुव्वा उडविला. यामध्ये अंकित गौरव यानेदोन तर, तालिब शहा याने तीन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. वैंकटेश कोवेहे, सतिश पाटील, धर्मेश्‍वर पोटे व हरीष शिंदे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. 

दुसर्‍या सामन्यात एक्सलन्स् अ‍ॅकॅडमीने हॉकी लव्हर्स संघाचा 12-0 असा एकतर्फी पराभव करून दिमाखात आगेकूच केली. यामध्ये आनंद राई, भूषण ढेरे, अनिकेत मुथय्या, विनीत शेट्टी व सुनिल राठोड यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. प्रिन्स् चौरसिया व रोमेश पिल्ले यांनी प्रत्येकी दोन तर, युवराज वाल्मिकी याने तीन गोल करून संघाला सोपा विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकालः उपांत्यपुर्व फेरीः 1) क्रिडा प्रबोधिनीः 9 (अंकित गौरव 3, 22 मि., तालिब शहा 6, 12, 41 मि., वैंकटेश कोवेहे 8 मि., सतिश पाटील 14 मि., धर्मेश्‍वर पोटे 28 मि., हरीष शिंदे 47 मि.) वि.वि. एसआरपीएफः 1 (रोहन पवार 32 मि.); हाफ टाईमः 6-0;

2) एक्सलन्स् अ‍ॅकॅडमीः 12 (आनंद राई 8 मि., भूषण ढेरे 22 मि., प्रिन्स् चावरसिया 23, 38 मि., रोमेश पिल्ले 24, 26 मि., युवराज वाल्मिकी 28, 44, 48 मि., अनिकेत मुथय्या 41 मि., विनीत शेट्टी 42 मि., सुनिल राठोड 45 मि.) वि.वि. हॉकी लव्हर्सः 0; हाफ टाईम 4-0;

आंतरशालेय मुलेः 14 वर्षाखालीलः सेंट उर्सुला, निगडीः 3 (जसकरण सिंग 8 मि., ओम कुटे 12, 18 मि.) वि.वि. लॉयला हायस्कूलः 0; हाफ टाईम 1-0;

2) पीसीएमसीः 1 (गणेश आठवले 14 मि.) वि.वि. सेंट उर्सुला, निगडीः 0;

आंतरशालेय 17 वर्षाखालीलः लॉयला हायस्कूलः 1 (जोशेवा एम. 17 मि.) वि.वि. ज्योती इंग्लिश, नेहरूनगरः 0;

2) एसएनबीपीः 4 (आकाश सिंग 6, 14, 20 मि., जयदीप घारे 19 मि.) वि.वि. ज्योती इंग्लिश, नेहरूनगरः 0;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.