Pune : वृत्तपत्रात फोटो छापून येण्यासाठी देवदर्शनाला जात नाही; शरद पवारांच्या अमित शहा यांना टोला

एमपीसी न्यूज – मी आतापर्यंत वारीला गेलो नाही, पण मला त्याविषयी अनादर आहे असं नाही. मुख्यमंत्री असताना कधीही शासकीय पूजा चुकविली नाही. मात्र वृत्तपतात फोटो छापून यावेत याकरिता कधीच देवदर्शन केले नाही. कारण मला अवडंबर केलेले आवडत नाही. या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टोला लगावला.

पुण्यात आज ह. भ. प. शामसुंदर महाराज लिखित ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तुकाराम महाराजांचे वंशज आणि देहू फडाचे प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, एस. यम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन चे सचिव सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश परांजपे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

पुण्यात मुक्कामी असलेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज दर्शन घेतले. यावर निशाना साधत शरद पवार यांनी शहा यांना टोला लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.