Dighi : तक्रार मागे घे म्हणत संपूर्ण कुटुंबाला पट्ट्याने मारहाण

एमपीसी न्यूज – मंत्रालयात व महावितरण येथे केलेली तक्रार मागे घे (Dighi) म्हणत एका तरुणाने संपूर्ण कुटुंबालाच कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली आहे. हा प्रकार दिघी येथे शुक्रवारी (दि.2) सायंकाळी घडला.

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कुणाल सोपान गायकवाड (वय 23 रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Maval : बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा सलग पाचव्या वर्षी 100 टक्के निकाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीला आरोपीने माझ्या विरोधात मंत्रालयात व महावितरण कंपनी येथे केलेली तक्रार मागे म्हणत शिवीगाळ केली व कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यावेळी फिर्यादी हे वाचविण्यासाठी गेल्या असाता आरोपीने त्यांना व त्यांच्या मुलांना बेल्टने मारहाण केली.

 

तसेच फिर्यादीचा गळा आवळून काचेने फिर्यादीची हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीला ढकलून देत त्यांचा विनयभंग केला. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Dighi)  आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.