Maval : बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा सलग पाचव्या वर्षी 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज – राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, टाकवे बुद्रुक संचलित बाळराजे ( Maval ) असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. सलग पाचव्या वर्षी 100 टक्के लागला आहे. ही शाळा मावळ ग्रामीण भागातील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा आहे.

प्रथम क्रमांक ओम उत्तम चोरघे (78 टक्के), व्दितीय क्रमांक अनुभव अनिल असवले (73.40 टक्के), तृतीय क्रमांक साक्षी प्रवीण असवले (73.20 टक्के) या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.

Hinjawadi : सुरक्षा रक्षकाकडून अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले, संस्थेचे सचिव रामदास वाडेकर, उपाध्यक्ष मनोज जैन, खजिनदार तानाजी आसवले, संचालक आतिश परदेशी, स्वामी जगताप, भूषण असवले, पांडुरंग मोढवे,राज खांडभोर सोमनाथ आसवले, दत्ता गायकवाड  रामदास कोद्रे आदींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

स्कूलचे मुख्याध्यापक किरण हेंद्रे यांनी मुलांचे कौतुक केले, सोबत स्कूलचे शिक्षक राज कांबळे,पूजा कालेकर,नेहा असवले,कांचन जाचक, प्रियांका कुडे,अविनाश जाधव, ऐश्वर्या मालपोटे, रुपाली ठाकर, माणिक मोहिते, वैशाली शेळके आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ( Maval ) अभिनंदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.