Talegaon : विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी दहा वाजता होणार लाऊडस्पीकर बंद

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी

एमपीसी न्यूज – मावळ (Talegaon) परिसरातील गणपतींचे सातव्या दिवशी विसर्जन होते. या दिवशी रात्री बारा पर्यंत लाऊडस्पीकरसाठी परवानगी नाही. यामुळे गणेशोत्सव मंडळांना आपल्या मिरवणुका दहा पर्यंत संपवाव्या लागणार आहेत. यामुळे मावळ परिसरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी आहे. लाऊडस्पीकरसाठी रात्री बारा पर्यंत वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांकडून केली जात आहे.

Pimpri : शहरातील पाणीपुरवठा शुक्रवारी विस्कळीत राहणार

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वर्षाच्या सुरुवातीला वर्षभरातील वेगवेगळ्या सण उत्सवांच्या वेळी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरण्यास सकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत सूट दिली आहे. ध्वनीची मर्यादा राखून ध्वनिक्षेपक वापरण्यास ही परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

मंगळवारी (दि. 19) गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे आगमन होत आहे. त्यानंतर पुढचे दहा दिवस गणपती बाप्पांचा मुक्काम असतो. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिवशी गणेश विसर्जन होते. दीड दिवसापासून विसर्जनाला सुरुवात होते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बहुतांश मंडळे वाजत गाजत मिरवणुका काढतात. या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत चालतात.

जिल्हाधिकाऱ्यांनी लाऊड स्पीकर वाजवण्यासाठी सूट दिलेल्या आदेशात गणेशोत्सवादरम्यान चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरसाठी परवानगी दिली आहे. 23 सप्टेंबर (पाचवा दिवस), 24 सप्टेंबर (सहावा दिवस), 26 सप्टेंबर (आठवा दिवस), 27 सप्टेंबर (नववा दिवस) या दिवशी ही सूट देण्यात आली आहे. मात्र, मावळ तालुक्यातील बहुतांश भागात, पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी आणि इतर भागात सातव्या दिवशी विसर्जन होते. या दिवशी रात्री बारा पर्यंत लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मिरवणुकांच्या आनंदावर विरझण पडले आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 95 गणेशोत्सव मंडळे आहेत. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे 30, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील सुमारे 25 ते 30 गणेशोत्सव मंडळे आहेत. वडगाव, कामशेत, लोणावळा परिसरात देखील शेकडो मंडळांची पोलीस दप्तरी नोंद आहे. या सर्व मंडळांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे हिरमूड झाला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने म्हणाले, “जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सातव्या दिवशी रात्री बारा पर्यंत परवानगी देण्यात आली तर त्याची आम्ही अंमलबजावणी करू. गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ही बाब आम्ही सर्व मंडळांना निक्षून सांगितली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत सूट देण्यात आली नाही तर गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करत मर्यादित वेळेत विसर्जन करावे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.