Khed : अपघातात कार चालकाचा मृत्यू , चार जण जखमी

एमपीसी न्यूज – कार अपघातात कार चालकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात 5 सप्टेंबर रोजी खेड(Khed)  येथील वडगाव घेनंद येथे घडला आहे.

सुमित भास्कर धायगुडे (वय 28 रा.चिखली) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार,  सुमित हा त्याच्या ताब्यातील कार बेदरकारपणे चालवत होता. यात अपघात झाला ज्यामध्ये सुमित च मृत्यू झाला तर सह प्रवासी अनिल खडप  व इतर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.  आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://youtube.com/shorts/WlTz7wYG3vI?si=kWzult8hn9kCVgrH

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.