Pimpri : कायदेशीर फेरीवाल्यांवरील कारवाई सहन करणार नाही – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेचे प्रशासन कायदा न पहाता गोरगरीबांच्या व्यवसायावरती कुऱ्हाड चालवित आहे. कायदेशीर फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न झाला तर यापुढे चक्काजाम होईल इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.

Khed : अपघातात कार चालकाचा मृत्यू , चार जण जखमी

संभाजीनगर चिंचवड येथे महापालिकेने दिलेल्या प्रमाणपत्र धारक फेरीवाल्यांवर कारवाईची भूमिका घेतली. मनमानी पद्धतीने जप्ती सुरू केली. हा कायद्याचा भंग असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, तरीही अधिकारी ऐकून न घेत नसल्यामुळे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशनच्या वतीने सर्वसामान्य नागरिक, फेरीवाले एकत्र येऊन अन्यायी कारवाईचा विरोध केला. त्यानंतर कारवाई स्थगित करण्यात आली. यापुढे कायदेशीर फेरीवाल्यांवरील कारवाई सहन करणार नसल्याचा इशारा काशिनाथ नखाते यांनी दिला.

सामाजिक कार्यकर्ते नाना वारे, बबन नऱ्हे, सुंदर राऊत , शिवलिंग स्वामी,ओमप्रकाश मोरया,यासीन शेख,शैलेश प्रसाद, आरिफ शेख, प्रकाश रोकडे, रितेश पिंजन,राजू आमटे,विठ्ठल गायकवाड, उमा खवळे यावेळी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.