Pimpri : राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने  ( Pimpri ) स्थापन झालेल्या नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशनच्या ( एनटीयुएफ) राष्ट्रवादी कामगार संघटना फेडरेशनच्या असंघटित कामगार विभागाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कामगार नेते काशिनाथ नखाते यांची निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मान्यतेने नियुक्तीचे पत्र शिवाजीनगर पुणे येथे देण्यात आले.

World Cup 2023 : रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला 102 धावांनी नमविले

यावेळी कामगार सेलचे सरचिटणीस सोमनाथ शिंदे, उपाध्यक्ष स्वप्निल भगत, राज्य सचिव तुषार घाटूळे, सचिन नागणे, उमेश डोर्ले आदी उपस्थित होते.कामगार नेते काशिनाथ नखाते हे असंघटित कामगारांच्या न्याय हक्काची लढाई सुमारे 25 वर्षापासून लढत आहेत. सुमारे 35 हजार कष्टकरी, कामगार  सभासदांच्या माध्यमातून कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये संघटनेचे कामकाज प्रभावीपणे सुरू आहे.

सध्याच्या सत्तेत असणाऱ्या सरकारकडून कामगारांवर होत असलेल्या अन्यायकारक धोरणे, कायद्यातील बदलामुळे कामगार ( Pimpri ) संकटात सापडला आहे. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे फेडरेशनच्याच माध्यमातून नखाते यांचे निवडीने काम उभे राहील.

या वेळी शिवाजीराव खटकाळे म्हणाले की, संसदेत  चुकीच्या पद्धतीने ठराव करून श्रमसंहिता लागू केल्यामुळे लाखो कामगार देशोधडीला लागलेले आहेत. कामगारांना कधीही काढून टाकले जात आहे. वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

अशा स्थितीत कामगारांना एकत्रित करून महाराष्ट्र राज्यामध्ये कामगारांचे संघटन बांधून हक्काची लढाई राष्ट्रवादी कामगार सेल व नॅशनल ट्रेड युनियनच्या माध्यमातून भविष्यामध्ये मोठे काम उभे राहील.

देशाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शिवजीराज खटकाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व फेडरेशननेच्या माध्यमातून विश्वास टाकत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी समर्थपणे पेलून महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

शिव, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ  विचारांचा वारसा जपण्यासाठी कामगार चळवळीला न्याय देण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहणार आहे. तसेच राज्यभर संघटन उभे करून कामगारांचे प्रश्न सोडविणार असल्याचे नखाते यांनी ( Pimpri ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.