Dudhiware Khind : दुधीवरे खिंडीत उटल्याने चालक जखमी

एमपीसी न्यूज : दुधीवरे खिंडीत ट्रक पलटी झाल्याने (Dudhiware Khind) चालक जखमी झाल्याची घटना आज सोमवार 12 डिसेंबर रोजी झाली आहे.

PCMC: पालिका मुख्यालयात दिव्यांग महिला, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय

याबाबत माहिती देताना, लोहगडचे पोलीस पाटील सचिन भोर्डे म्हणाले, की पवनानगर येथील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू आहे. त्यासाठी ठेकेदाराचा एक ट्रक डांबर घेऊन जात होता. तो ट्रक चढ चढत असताना ब्रेक फेल झाल्याने ट्रक रिव्हर्स मागे गेला व पलटी होऊन पडला. या अपघातात चालकाच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. पलटी झालेला ट्रक सरळ करण्याचे काम सुरु आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.