Pimpri Fraud : कुरीयर कंपनीची जादू; पाठवला आयफोन मिळाला कार्बन कंपनीचा फोन

एमपीसी न्यूज – कुरियरने पाँडिचेरी (Pimpri Fraud) येथे अॅपल कंपनीचा मोबाईल पाठवला असता पाँडिचेरी येथील व्यक्तीला अॅपल कंपनीचा मोबाईल न मिळता कार्बन कंपनीचा मोबाईल मिळाला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात कुरिअर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 ते 10  डिसेंबर या कालावधीत प्रतीक्षा एंटरप्राइजेस पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रोफेशनल कुरिअरचे मालक आणि कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dudhiware Khind : दुधीवरे खिंडीत उटल्याने चालक जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने 1 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील प्रोफेशनल कुरियर कंपनी असलेल्या प्रतीक्षा एंटरप्राइजेसच्या माध्यमातून अॅपल कंपनीचा मोबाईल फोन पाँडिचेरी येथील एका व्यक्तीला पाठवला. 12 डिसेंबर रोजी ते कुरिअर पॉंडिचेरी (Pimpri Fraud) येथे पोहोचले. पाँडिचेरी येथील व्यक्तीला अॅपल कंपनीचा मोबाईल फोन न मिळता त्यांना कार्बन कंपनीचा मोबाईल मिळून आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.