Pimpri News: 100 वर्षे आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक क्षण 100 टक्के जगता आला पाहिजे

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने महापालिकेच्या (Pimpri News) वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘क’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचा-यांचे प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आले होते. 100 वर्षे आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक क्षण 100 टक्के जगता आला पाहिजे, असे मार्गदर्शन डॉ. अनिल जगताप यांनी केले.

यावेळी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, शीतल वाकडे, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक, प्रसिध्द वक्ते अशोक देशमुख, पतंजली योग समितीचे डॉ. अनिल जगताप, सहायक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे, तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, क्षितीज रोकडे, सतीश इंगेवाड, उमेश कांबळे, कॅम फाउंडेशनचे शाम राठोड, प्रसन्न येवलकर, डिव्हाईन या माध्यम संस्थेचे प्रतिनिधी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

Pimpri Fraud : कुरीयर कंपनीची जादू; पाठवला आयफोन मिळाला कार्बन कंपनीचा फोन

प्रसिद्ध वक्ते अशोक देशमुख यांनी हास्य विनोदांद्वारे उपस्थित (Pimpri News) सफाई कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, काम करत असताना तणावमुक्त असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे कामावर 100 टक्के लक्ष केंद्रित होते. हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होण्यास मदत होते. हास्य हा देखील एक उत्तम व्यायाम असून तो केल्यास आयुष्याकडे आपला पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो असे देखील त्यांनी सांगितले.

डॉ. अनिल जगताप यांनी योगा विषयक मार्गदर्शन केले. सफाईचे काम करत असताना अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. योगा आणि प्राणायाम केल्याने अनेक आजार टाळता येऊ शकतात किंवा त्यावर मात करता येऊ शकते याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. 100 वर्षे आयुष्य जगण्यासाठी प्रत्येक क्षण 100 टक्के जगता आला पाहिजे, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच त्यांनी यावेळी अनेक योगमुद्रांची प्रात्यक्षिके करून दाखवली.

नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या ‘क’ आणि ‘ग’ कार्यालयांच्या अधिनस्त असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोफत रोजगारभिमुख शिक्षण आणि कोर्सेसबद्दल सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रीती शिंदे यांनी यावेळी माहिती दिली.

“अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क 2022” या उपक्रमांतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण करण्यात येत असून याबाबतची माहिती स्मार्ट सिटी लिमिटेडच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक यांनी केले. तर, सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.