Alandi : माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांची माऊली मंदिरास सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज :  भारताचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी दि. 30 जून रोजी आपल्या कुटूंबियां समवेत माऊलीं मंदिरास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी  श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी ,सिद्धेश्वर महाराज,आजनवृक्ष,सुवर्ण पिंपळ यांचे दर्शन घेतले.व मंदिरातील ध्यान मंदिराला ही त्यांनी यावेळी भेट दिली.

Rain News : पावसाला सुरुवात झाली पण महिनाभरात सरासरीही गाठता आली नाही

यावेळी त्यांचा सन्मान  व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी शाल,श्रीफळ,श्रीज्ञानेश्वरदर्शन ग्रंथ देऊन केला. माजी विश्वस्त डॉ  सारंग जोशी,सुभाष  बोराटे,मनसुख लोढा,प्रसाद बोराटे, पो. आ.रोहन गायकवाड ,मच्छींद्र शेंडे,जालिंदर जाधव , स्वकाम सेवा स्वयंसेवक व इतर मान्यवर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

 

माऊलींच्या संजीवन समाधी दर्शना नंतर त्यांनी आळंदी येथील माजी विश्वस्त डॉ. सारंग जोशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.