Pune : लष्कराच्या यंग ऑफिसर्स कोर्स-30 आणि ग्रॅज्युएशन कोर्स-18 यांचा हिरक महोत्सवी सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – पुण्यतील सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग – CME) येथे (Pune) लष्कराच्या यंग ऑफिसर्स कोर्स-30 आणि ग्रॅज्युएशन कोर्स-18 चे माजी लष्करी अधिकारी या अभ्यासक्रमाच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकत्र आले. 29 जून 1963 रोजी या अभ्यासक्रमाअंतर्गत ते भारतीय लष्करात रुजू झाले होते.

या तुकडीचा हीरक महोत्सव साजरा करण्यासाठी आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी गुरुवारी त्यातील 40 जणांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगला भेट दिली. सन 1965 आणि 1971 चे युद्धात भाग घेतलेल्या या तुकडीचे मेजर सुरिंदर वत्स यांना त्यांच्या अतुलनीय धैर्यासाठी आणि लढाऊ वृत्तीसाठी मरणोत्तर वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. हा 1971 च्या युद्धादरम्यानचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. अनेक माजी अधिकारी सपत्नीक उपस्थित होते तसेच ‘वीर नारी’ देखील उपस्थित होत्या.

सीएमईच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीच्या समोर माजी अधिकाऱ्यांचे छायाचित्र काढून या सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर या कोर्सचे सर्वात वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल एनपी औल, एव्हीएसएम (निवृत्त) यांचे स्वागतपर भाषण झाले. त्यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. कमांडंट, सीएमई यांनी देखील माजी विद्यार्थी संमेलनाला संबोधित केले आणि (Pune) त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त केला.

Rain News : पावसाला सुरुवात झाली पण महिनाभरात सरासरीही गाठता आली नाही

तसेच हा विशेष दिवस साजरा करण्यासाठी देशभरातून इथे एकत्र जमल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. त्यांनी लष्करी कारवाया, लष्करी खेळ आणि नागरी सेवा क्षेत्रातील असाधारण कामगिरी तसेच अभ्यासक्रमाच्या यशाचा उल्लेख केला. त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि काही अपरिहार्य कारणांमुळे जे येऊ शकले नाही त्यांनाही शुभेच्छा दिल्या. अभ्यासक्रमाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

संध्याकाळी, कॉम्बॅट लायब्ररी फॅकल्टी, सीएमई येथे खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाने माजी अधिकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.