Pimple Saudagar News : शिवजयंती निमित्ताने पिंपळे सौदागर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज –  डॉ अगरवाल आय हॉस्पिटल हा नेत्र रुग्णालयातील भारतातील सुप्रसिद्ध ब्रँड आहे. पिंपरी-चिंचवड मधील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ् डॉ बबन डोळस यांच्या (Pimple-saudagar News) बरोबर नुकतेच डॉ अगरवाल आय हॉस्पिटल च्या नवीन शाखेची सुरुवात झाली आहे. याठिकाणी शिवजयंती चे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती चे औचित्य साधून येत्या 19 फेब्रुवारी पासून पिंपळे सौदागर येथील रुग्णालयात मार्च अखेरपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ बबन डोळस यांनी दिली आहे. डॉ बबन डोळस हे गेली 25 वर्षे पिंपरी-चिंचवड येथे नेत्र सेवा देत आहेत. *ग्लोबल* संस्थेमार्फत 2008 साली शहरातील प्रथम नेत्र पेढी देखील त्यांनी सुरु केली आहे.

Pune Bye-Election : भाजपच्या किंगमेकर नंतर आता राष्ट्रवादीचे किंगमेकर उतरणार मैदानात; कसबा जागेसाठी शर्थीची लढत

पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना माफक आणि दर्जेदार अत्याधुनिक नेत्र सेवा देता यावी यासाठी डॉ अगरवाल नेत्र रुग्णालयाशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला आहे.(Pimple saudagar News) अशी माहिती नेत्रतज्ञ डॉ बबन डोळस यांनी सांगितले. मोफत नेत्र तपासणी साठी 8800668455 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी  केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.