Gahunje : सामाईक रस्ता बंद केल्याने दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – सामाईक रस्ता बंद केल्याने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Gahunje )आहे. ही घटना 14 मे रोजी गहुंजे येथे घडली.

Wakad : हातभट्टी दारू विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

राहुल कुलकर्णी, रमेश कुलकर्णी (दोघे रा. गहुंजे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सतीश शंकरराव धुमाळ (वय 50, रा. पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा सन 2007 पासून वापरत असलेला जाण्या येण्याचा रस्ता बंद केला. तो रस्ता चालू करायचा असल्यास पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत (Gahunje )आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.