Gahunje : घरात घुसून वडिल व मुलाला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून झालेल्या (Gahunje) वादातून एका टोळक्याने तरुणाच्या घरात घुसून तरुणाच्या वडिलांची कॉलर पकडली. वडिलांना दम देत त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजता गहुंजे येथे घडली.

सागर जालिंदर बोडके (वय 26, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकी शर्मा, प्रज्वल मळेकर, करण भिसे आणि अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकी शर्मा आणि फिर्यादी सागर यांचे मामुर्डी येथे मांडव टहाळ्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून विकी शर्मा त्याच्या साथीदारांना घेऊन सागर यांच्या घरात घुसला. त्याने सागर यांच्या वडिलांची कॉलर पकडून ‘तुम्हाला लय माज आला आहे.

Pune : ‘सचोटीने व्यावसायिकता जपणारे स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व म्हणजे कृष्णकुमार गोयल’ – अरुण फिरोदिया

तुमचा मुलगा सागर बोडके याचा खून करतो. त्याला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर विकी याने कोयत्याने (Gahunje) सागर यांच्या घराच्या समोरील खिडकीची काच फोडून नुकसान केले. तसेच गल्लीत आरडा ओरडा करत दहशत निर्माण केली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.