Gahunje : सोशल मीडिया मार्केटिंगचे आमिष दाखवून व्यावसायिकाला पावणे अकरा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – फ्री सोशल मीडिया मार्केटिंग जॉबचे (Gahunje) आमिष दाखवत एका व्यावसायिकाला तब्बल पावणे अकरा लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 16 जुलै 19 जुलै 2023 या कालावधीत गहुंजे येथे घडला.

याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या व्हाट्सअप नंबरवर एक मेसेज आला. त्यात म्हटले होते की, आम्ही एका मार्केटिंग एजन्सी मधून बोलत असून आम्ही लोकांना फ्री जॉब ऑफर करतो. हे सोशल मीडिया मार्केटिंगचे जॉब असून यामध्ये केवळ तरुण मुलांना हायर केले जाते.

या जॉबमध्ये केवळ इंस्टाग्रामवर जाऊन इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचे असते. त्यासाठी तुम्हाला 70 हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकते. काही लोकांना तर एका दिवसासाठी 24 हजार रुपये देखील मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी फिर्यादी यांना डेमो दाखवण्यासाठी एक लिंक व्हॉट्सॲपवर (Gahunje) पाठवली.

Pimpri : घरात घुसून एकाला मारहाण,नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल

या अकाउंटला फॉलो केले असता तुम्हाला लगेच 210 रुपये अकाउंटवर पाठवले जातील, असे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी लिंक फॉलो करत पुढील प्रोसेस केली. यासाठी त्यांना एक फॉर्म पाठवण्यात आला, ज्यावर त्यांना त्यांचं नाव, वय, कामाचा अनुभव व बँक खात्याची माहिती द्यावयाची होती.

ती माहिती फिर्यादी यांनी भरली. तीन दिवसाच्या कालावधीत फिर्यादी यांना विविध व्यवहाराबद्दल पैसे पाठवण्यासाठी भाग पाडले व मीडिया मार्केटिंगच्या नावाखाली एकूण दहा लाख पंच्याऐंशी हजार 250 रुपयांची फसवणूक करण्यात आली. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसांमध्ये संबंधित व्हाट्सअप क्रमांक धारकाविरुद्ध तक्रार दिली. याचा पुढील तपास शिरगाव पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.