Maval : पवना नदीच्या काठावरील तीन दारू भट्ट्या उध्वस्त

एमपीसी न्यूज – शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या (Maval) काठावर लावण्यात आलेल्या तीन दारू भट्ट्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उध्वस्त केल्या. बुधवारी (दि. 13) केलेल्या या कारवायांमध्ये 20 हजार 500 लिटर रसायन नष्ट करण्यात आले.

पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पवना नदीच्या काठावर दारू भट्ट्या लावल्या असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारू भट्ट्यांवर छापा मारून कारवाई केली.

Pimpri : श्रीरंग बारणे  पुन्हा खासदार होतील –  उदय सामंत

या कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी तसेच शिरगाव, तळेगाव दाभाडे आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. बुधवारी (Maval) सायंकाळी साडेचार ते साडेआठ या कालावधीत शिरगाव परिसरात दोन तर आढले बुद्रुक येथे एक अशा तीन दारू भट्ट्यांवर कारवाया करण्यात आल्या.

याप्रकरणी तीन गुन्हे दाखल केले असून पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सुमारे चार लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.