Pimpri : श्रीरंग बारणे  पुन्हा खासदार होतील –  उदय सामंत

एमपीसी न्यूज –  दीड महिन्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा ( Pimpri ) मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील, असे सांगत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

महायुतीच्या जागावाटपात मावळ लोकसभा कोणाकडे जाणार हे आद्यप ठरले नाही.  सामंत यांनी एक प्रकारे बारणे यांची उमेदवारी घोषित केली. मंत्री सामंत म्हणाले की,  देशाच्या संसदेत अशा व्यक्तींची गरज आहे. उद्या लोकसभा निवडणूक प्रचाराला मला त्यांनी बालोवले तरी मी नक्की येईल. मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत खासदार बारणे यांनी  पाठपुरावा केला.

PCMC : पालिकेची उधळपट्टी सुरूच, विद्युत राेषणाईसाठीही सल्लागार

पवना, इंद्रायणी या नद्यांच्या प्रदुषणाबद्दल बारणे यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेत. यापूर्वी अनेकजण येऊन गेले त्यांचा दृष्टीकोन काय होता माहित नाही, पण बारणे यांनी त्यासाठी सतत पाठपुरावा केला. चार महिन्यांपूर्वीच या विषयावर महापालिकेत बैठक घेतली. आम्ही या प्रकल्पासाठी तीन वर्षांत दोन हजार कोटी रुपये खर्च करतोय. आता त्या कामाचा डीपीआर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी त्याचे टेंडर होईल, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी यावेळी (Pimpri) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.