PCMC : पालिकेची उधळपट्टी सुरूच, विद्युत राेषणाईसाठीही सल्लागार

एमपीसी न्यूज – दापोडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका ( PCMC) या स्टेशनदरम्यान असलेल्या पिलरमधील मोकळ्या जागेत महामेट्रोऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिका विद्युत दिवे बसविणार आहे. यासाठीच्या 6 कोटी खर्चाला स्थायी समिती सभेने मान्यता दिल्यानंतर आता  त्या प्रकाशव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवटीत उधळपट्टीचा कारभार सुरू असल्याची टीका हाेऊ लागली आहे.

Pimpri : प्रतिभा महाविद्यालयात महिला दिन साजरा

पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते पिंपरी अशी मेट्रोची मार्गिका आहे. त्या मार्गिकेची देखभाल होत नसल्याने त्यात राडारोडा, कचरा साचून दुर्गंधी सुटली आहे. त्यास झाडे व रोपे लावण्यात आलेली नाहीत. अनेक ठिकाणी पिलरचे रंग उडाले आहेत. तसेच, काही पिलरवर पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसर विद्रुप दिसत आहे. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची  खरडपट्टी ( PCMC) काढली होती. मेट्रोचे काम असताना महापालिका स्वखर्चातून मेट्रो पिलरच्या मध्ये विद्युत प्रकाशाचे खांब उभारत आहेत. त्यासाठी 6 कोटी खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीच्या मान्यता दिली आहे.

मेट्रोचा खर्च महापालिका करीत असल्याने विरोधकांनी त्यावरून संताप व्यक्त केला आहे. असे असताना पालिका आता हे दिवे योग्य दर्जाचे आहेत की नाहीत. ते व्यवस्थितपणे लावले आहेत की नाही, दिवे व इलेक्ट्रिक साहित्यांची तपासणी करणे, प्रत्यक्ष लावताना पाहणी करणे या कामासाठी पालिकेने पुण्यातील शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या सल्लागारास पालिका टप्याटप्प्याने शुल्क देणार आहे. असे एकूण 6 कोटी खर्चाच्या1.34  टक्के असे सुमारे 8 लाख शुल्क महापालिका ( PCMC) देणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.