Gardening Tips: असा फुलवा घरातल्या घरीच बगीचा

gardening tips in marathi

एमपीसी न्यूज – आपल्या प्रत्येकालाच बाल्कनीमध्ये सुंदर झाडं असावी किंवा छानसं गार्डन असावं, असं वाटतं. पण आपल्या धावपळीच्या आयुष्यात आणि छोट्याशा जागेत गार्डन असणं तर स्वप्नवत आहे. साधारणपणे प्रत्येकाच्या फ्लॅटला आजकाल मोठ्या खिडक्या किंवा बाल्कनीज असतातच. त्यामुळे आपण त्यालाच छोट्याश्या बाल्कनी गार्डनमध्ये बदलू शकतो. या सुंदर बाल्कनी गार्डनमध्ये तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात बसून मस्तपैकी चहाचा आस्वाद घेऊ शकता तर थंडीच्या दिवसात उन्हाची ऊब घेऊ शकता.

खासकरुन पावसाळ्याचं पाणी हे रोपांसाठी जीवनदानाचं काम करतं. पावसाळ्यात त्यांची वाढ नैसर्गिकरित्या होते. इतर महिन्यांपेक्षा जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाला रोपांचा जास्त प्रतिसाद असतो. त्यामुळे आपण या काळात तुमच्या बाल्कनी गार्डनला नवा लुक नक्कीच देऊ शकतो. हे पाहायलाही फ्रेश वाटेल आणि घरात सकारात्मक एनर्जीही येईल. फक्त यासाठी पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज सिस्टम आणि रोपांच्या रचनेमध्ये तुम्हाला थोडेफार बदल करावे लागतील.

बाल्कनी गार्डन टीप्स –

झाडांची रचना आणि सजावट

1) तुमच्या घरात जर एखादं जुनं लाकडाचं टेबल असेल, तर ते बाल्कनी किंवा टेरेसमध्ये शिफ्ट करा आणि त्यावर कुंड्या ठेवा. यामुळे तुम्हाला झाडांना व्यवस्थित पाणी देता येईल आणि गार्डनला एक वेगळा लुकही मिळेल.

2) तुम्ही तुमच्या घरातील गार्डनला व्यवस्थित जागा दिल्यास त्यात तुम्ही पॉन्ड, वॉटर फॉल, बर्ड फिडर लावूनही डेकोरेट करु शकता. तसंच इतरही डेकोरेटीव्ह गोष्टींनी तुमची बाग सजवू शकता. जसं हँगिंग कुंड्या, रंगीबेरंगी पेबल्स, डिझाईनर स्टोन्स, कृत्रिम गवत किंवा अगदी घरातील जुन्या काचेच्या बाटल्यांचा किंवा तांब्याचं घंगाळ यांचाही वापर करु शकता.

3) नेहमीच्या कुंड्यासोबतच बाजारात तुम्हाला बेडूक, कासव यांच्या आकारातील कुंड्याही आजकाल मिळतात. ज्या दिसायला नेहमीच्या कुंड्यापेक्षा छान असतात. यामध्ये रोपं लावून तुम्ही त्याच्या बाजून आर्टिफिशियल झऱ्याची रचना करू शकता.

पावसाळ्यात रोपांची काळजी
1)पावसाळ्याच्या दिवसात जास्त वेगाने वाढणारी रोपं लावा. रोपांची लागवड करताना ती एका रांगेत लावता येतील ते पाहा. ज्यामुळे तुमच्या बाल्कनी गार्डनला छान लुक मिळेल.

2)ज्या रोपांना प्रकाशाची गरज असते त्यांची जागा बदला. म्हणजे त्यांना ऊन आणि सावली दोन्ही चांगलं मिळेल.

3)पाऊस पडताच किडे, गांडूळ आणि इतर पावसाळी किटक मातीतून बाहेर पडतात. जर तुम्ही बाल्कनीमध्ये रोपांची लागवड करत असाल तर या गोष्टींचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. त्यामुळे शक्यतो रोपं एकाच ठिकाणी ठेऊ नका. त्यांच्यामध्ये थोडं अंतर ठेवा, ज्यामुळे त्यांची स्वच्छताही तुम्हाला नीट करता येईल.

4)तसंच पावसाळ्याच्या दिवसात कुंड्यामध्ये किंवा बाल्कनीत पाणी साचून राहणार नाही, याचीही खास काळजी घ्या. नाहीतर त्यामुळे आजारांना आमंत्रण मिळू शकतं.

एकता चौधरी यांच्या Gardenup या इन्स्टाग्राम अकाउंट वरून साभार : 

View this post on Instagram

Evening Serenity..✌️

A post shared by Garden Up (@gardenup.in) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.