Pimpri: माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

Pimpri: Former corporator Laxman Gaikwad dies due to corona लक्ष्मण गायकवाड 2002 साली नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गांधीनगर भागाचे त्यांनी पालिकेत प्रतिनिधित्व केले होते.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शामराव गायकवाड (वय 65 ) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज सोमवारी पहाटे वायसीएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लक्ष्मण गायकवाड 2002 साली नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गांधीनगर भागाचे त्यांनी पालिकेत प्रतिनिधित्व केले होते. झोपडपट्टी सुधारणा समितीचे सभापती पद देखील त्यांनी भूषविले होते.

रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पिंपरी-चिंचवड शहरातील दलित चळवळीच्या विविध घटनांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनाने दलित चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता हरपल्याची भावना रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.