Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयाच्या एम.ए मराठीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या पदव्युत्तर पदवी (एमए) मराठी विभागाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाच्या वर्षीही कायम राहिली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल 92.30 टक्के लागला आहे.

Urse : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा उर्से टोल नाक्यावर धडक मोर्चा

मराठी विभागातील विद्यार्थी प्रभाकर तुमकर यांनी 82.63 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. जयश्री चांदेरे (मोडक) यांनी 81 टक्के गुण मिळवून द्वितीय तर सौरभ चेचरे यांनी 78.19 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

अनेक शैक्षणिक संसाधनांची उपलब्धता, तज्ञ  प्राध्यापक, विविध चर्चासत्रे, विद्यार्थी समुपदेशन वर्ग, अभ्यासिकेची सोय यांमुळे इंद्रायणी महाविद्यालयाचा मराठी विभाग सक्षम ठरला आहे.

या यशाबद्दल इंद्रायणी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, प्राचार्य डॉ संभाजी मलघे, संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन केले. डॉ. संदीप कांबळे व प्रा. सत्यजित खांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.