Chakan rain : चाकण परिसराला धुवॉंधार पावसाने झोडपले

एमपीसी न्यूज : मुसळधार पावसाने चाकण परिसराला सोमवारी (दि.17 ऑक्टोबर ) रात्री दहा पासून मंगळवारी पहाटे पर्यंत झोडपले. (Chakan rain) रात्री तीन ते चार तास तास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आयएआय कंपनीच्या संपूर्ण परिसरात थेट महामार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने संपूर्ण वाहतूक पहाटे पासून ठप्प झाली आहे. या भागातील सर्वच महामार्गांवर सुमारे आठ ते दहा किमी पर्यंत रांगा लागल्या आहेत.

पुणे नाशिक महामार्गावर साचलेल्या पाण्यात काही वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे संपूर्ण महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गासह लगतचे सर्व रस्ते सुद्धा यामुळे ठप्प झाले आहेत. (Chakan rain) वाहतूक विभागाने या भागात आणखी वाहने अडकून पडू नयेत यासाठी चाकण शिक्रापूर रस्त्यावर काही ठिकाणी वाहतूक रोखली आहे. आळंदी फाटा ते रिलायन्स पंपाच्या जवळील भागात खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खूप मोठा खोळंबा झाला आहे. वाहतूक संपूर्ण ठप्प असल्याने घराबाहेर पडलेल्या विद्यार्थी व नोकरदार मंडळींनी पुन्हा घरची वाट धरली.

Pimpri Corona Update : शहरात आज 11 नवीन रुग्णांची नोंद; 46 जणांना डिस्चार्ज

तळेगाव चौकाजवळ आणि आंबेठाण चौकाजवळील उड्डाण पुलालगतचा महामार्ग आणि सेवा रस्ते काही ठिकाणी पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांची अक्षरशः दाणादाण उडाली.(Chakan rain) या धुवॉंधार पावसाने चाकण शहरातील सखल भागातील अनेक सोसायट्यांमध्ये, चाकण आंबेठाण रस्त्यावरील काही दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. यंदाच्या पावसाळ्यातील विक्रमी पावसाने अक्षरशः हा संपूर्ण भाग झोडपून काढला.

मुसळधार पावसामुळे शहरातील सर्वच सखल भागात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज मधून पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते.(Chakan rain) चाकण मध्ये पुणे नाशिक महामार्गाच्या लगतच्या सेवा रस्त्यांना तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते. वाहतूक विभागाकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहे; मात्र दुपारपर्यंत यश आलेले नव्हते. संपूर्ण परिसरात या पावसाने दाणादाण उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.