Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार

7 इमारती एकामागून एक कोसळल्या

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गुरुवारी झालेल्या पावसामुळे (Himachal Pradesh)  अनेक बहुमजली इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या.इमारती कोसळल्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.कुल्लू येथील नवीन बसस्थानकाजवळ नुकतीच एक मोठी नैसर्गिक दुर्घटना घडली आहे.

संततधार पाऊस आणि ताज्या भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेक बहुमजली इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या . अवघ्या काहीच सेकंदात या भागातल्या 7 इमारती एकामागून एक कोसळल्या.सततच्या पावसामुळे या इमारतींना भेगा पडल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने तीन दिवसांपूर्वीच या इमारती रिकाम्या केल्या होत्या

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. राज्याची राजधानी शिमल्यामध्ये 2017 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून पावसाने 122 वर्षांचा विक्रम मोडित काढला आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी, शिमला आणि सोलानमध्ये गेल्या 24 तासांत ढगफुटीच्या 4 घटना घडल्या आहेत.राज्यातले तीन राष्ट्रीय महमार्ग आणि 538  रस्ते पावसामुळे बंद आहेत.

Today’s Horoscope 25 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मुसळधार पावसामुळे कुल्लू-मंडी रस्ता खराब झाल्याने  कुल्लू जिल्ह्यात शेकडो वाहने अडकून पडली. पांडोहमार्गे पर्यायी मार्गाचेही नुकसान (Himachal Pradesh) झाले.  राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या आकडेवारीनुसार, बाधित झालेल्या रस्त्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग 21 (मंडी-कुल्लू रस्ता) आणि NH 154 (मंडी-पठाणकोट) यांचा समावेश आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये या महिन्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 120 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच उत्तराखंडमधील मुसळधार पावसामुळे चमोली जिल्ह्यातील पिंडार नदी आणि तिची उपनदी प्राणमतीच्या पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाली असून, त्यांच्या काठावर असलेल्या ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला (Himachal Pradesh) आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) दोन्ही राज्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.