Pune : वरंधा घाट आजपासून वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज – घाटमाथ्यावरील पाऊस कमी झाला असल्याने भोर-महाड या ( Pune) मार्गावरील पुण्याच्या हद्दीतील वरंधा घाट शुक्रवारपासून (25 ऑगस्ट) सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे. भोरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी याबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले.

Pune : पुण्यात पुन्हा 58 लाखांचे मॅफेड्रॉन, हेरॉईन पकडले

भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टी बाबत  रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला होता. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने भोर-महाड मार्गावरील पुण्याच्या हद्दीतील वरंधा घाट 30 सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आला होता. वाहनाची वाहतूक बंद करुन इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतुक सुरु ठेवण्यात आली होती.

आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आलेले नाहीत. परिणामी वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.