Pune : पुण्यात पुन्हा 58 लाखांचे मॅफेड्रॉन, हेरॉईन पकडले

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोहगाव भागात मॅफेड्रॉन, हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी ( Pune)  पथकाने अटक केली. आरोपीकडून 58  लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोपीचंद रामलाल बिश्नोई (वय 28, सध्या रा. चऱ्होली, मूळ, रा. जालोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे अधिकारी पथकासह शहर परिसरात गस्त घालत होते. या दरम्यान लोहगावमधील काळेनगर भागात एक व्यक्ती  मॅफेड्रोन (एम.डी.) आणि हेरॉईन हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून बिश्नोईला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 10  लाख 77  हजार 200 रुपये किंमतीचा 53  ग्रॅम एम. डी. तसेच 46  लाख 89 हजार रुपये किमतीचा 312  ग्रॅम हेरॉईन आढळून आले. त्याच्याकडून अंमली पदार्थासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेक्र, अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके,  दिगंबर चव्हाण, अंमलदार योगेश मांढरे, महेश साळुंखे, शिवाजी घुले, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे यांच्या पथकाने ही कामगिरी ( Pune) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.